भाजपची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका - चंद्रकांत पाटील

भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात अशास्त्रीय आघाडी बनविली
भाजपची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका - चंद्रकांत पाटील
Published on

एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले आहे वा त्यांची जी भूमिका आहे त्यात भाजपचा कोणताही सहभाग नाही. महाविकास आघाडी सरकार टिकणार की जाणार हे आताच सांगणे घाईचे ठरेल. या एकूणच परिस्थितीबाबत भाजपची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपने सत्तास्थापनेबाबत शिंदे यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही वा शिंदे यांच्याकडूनही तसा कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचेही ते म्हणाले.

भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात अशास्त्रीय आघाडी बनविली. मात्र, तेव्हापासूनच शिवसेनेच्या आमदारांत खदखद होती. पहिल्या महिन्यापासूनच त्यांनी याबाबत प्रश्न विचारण्यास सुरूवात केली होती. तेव्हा नेतृत्वाने ही केवळ तात्पुरती व्यवस्था आहे. भाजपला धडा शिकविण्यासाठी हे केले आहे, परंतु, आपण भाजपसोबतच जाणार असल्याचे सांगत त्यांची समजूत काढली होती. मात्र, आता शिवसेनेच्या आमदारांची घुसमट होत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in