अदानीसाठीच भाजपचे काम सुरू -वर्षा गायकवाड

भारतीय जनता पक्षाचे सरकार अदानीसाठी काम करत असल्याचे जगजाहीर आहे. केवळ एका व्यक्तीसाठी सर्व सरकारी यंत्रणा राबत आहे.
File Photo
File Photo

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार अदानीसाठी काम करत असल्याचे जगजाहीर आहे. केवळ एका व्यक्तीसाठी सर्व सरकारी यंत्रणा राबत आहे. सर्व नियम, अटी अदानीचा फायदा पाहून आखल्या जात आहेत. मुंबईच्या मोक्याच्या तसेच सरकारी जागा मोदानीच्या घशात मोफत घालण्याचा प्रयत्न सुरू असून अदानीसाठी भाजप सरकार लँड माफियासारखे काम करत असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे. महानंद दुग्ध प्रकल्प गुजरातला दिल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, महानंदच नाही तर मुंबईच्या सर्वच मोक्याच्या जागा मोफत अदानीला देण्यासाठी भाजप सरकार काम करत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in