कारच्या धडकेत अंध व्यक्तीचा मृत्यू

याप्रकरणी क्लेरेन्स लेस्ली पिटर फणसेका या ७४ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे
कारच्या धडकेत अंध व्यक्तीचा मृत्यू

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या कारच्या धडकेत ४६ वर्षांच्या अंध व्यक्तीचा मृत्यू झाला. अन्वर मेडा खान असे या मृत व्यक्तीचे नाव असून, त्याच्या मृत्यूप्रकरणी क्लेरेन्स लेस्ली पिटर फणसेका या ७४ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सरवर मेडा खान हे खार परिसरात त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत असून, मृत अन्वर हा त्यांचा मोठा भाऊ आहे. तो जन्मपासून आंधळा असून, वांद्रे येथील गौसिया मशिदीजवळ भिक्षा मागतो. गेल्या काही वर्षांपासून तो त्यांच्या काकाच्या मुलासोबत खार परिसरात राहत होता. गुरुवारी रात्री सव्वाअकरा वाजता अन्वर हा वांद्रे येथील खैरवाडी ब्रिज जंक्शनजवळ रस्ता क्रॉस करत होता. यावेळी भरवेगात जाणाऱ्या एका कारने त्याला धडक दिली होती. त्यात त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in