मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म विस्तारासाठी दोन दिवस रात्रकालीन 'पॉवरब्लॉक'; 'या' लोकल रद्द , लांबपल्ल्याच्या गाड्यांनाही फटका

मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म विस्तारासाठी दोन दिवस रात्रकालीन 'पॉवरब्लॉक'; 'या' लोकल रद्द , लांबपल्ल्याच्या गाड्यांनाही फटका

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील लांब पल्ला गाड्यांच्या प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शुक्रवार, १० आणि शनिवार, ११ मे रोजी मध्य रेल्वेवर रात्री पॉवर ब्लॉक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील लांब पल्ला गाड्यांच्या प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शुक्रवार, १० आणि शनिवार, ११ मे रोजी मध्य रेल्वेवर रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान शुक्रवारी रात्री लोकलसह मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तर शनिवारी रात्री १२.३० नंतर भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकादरम्यान लोकल वाहतूक पहाटे साडेचार वाजेपर्यत पुर्णपणे बंद राहणार आहे.

प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी शुक्रवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल दादर स्थानकांपर्यतच चालविण्यात येणार आहे, तर सीएसएमटी स्थानकातून रात्री ९.५४ वाजता सुटणारी कल्याण लोकल आणि रात्री ११.०५ वाजताची कल्याण ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे.

तसेच शनिवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर तसेच वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप-डाउन दोन्ही मार्गावर ब्लॉक असेल. यामुळे हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, मऊ-सीएसएमटी विशेष, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, नागपूर-सीएसएमटी सुपरफास्ट स्पेशल, हावडा-सीएसएमटी मेल या गाड्या दादर स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे, तर मुख्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

शेवटच्या सुटणाऱ्या लोकल

सीएसएमटी -कसारा रात्री १२.१४

कल्याण-सीएसएमटी रात्री १०.३४

सीएसएमटी-पनवेल रात्री १२.१३

पनवेल-सीएसएमटी रात्री १०.४६

ब्लॉकनंतर सकाळी सुटणाऱ्या पहिल्या लोकल

सीएसएमटी-कर्जत पहाटे ४.४७

ठाणे-सीएसएमटी पहाटे ४

सीएसएमटी-पनवेल पहाटे ४.५२

सीएसएमटी-बांद्रा पहाटे ४.१७

logo
marathi.freepressjournal.in