रक्तदाब रुग्णांची तपासणी मोहीम राबवणार

पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवून सहा हजार मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.
रक्तदाब रुग्णांची तपासणी मोहीम राबवणार

कोरोनाला उतरती कळा लागल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण विविध कारणांमुळे तणावाखाली गेले आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात १८ ते ६९ वयोगटातील मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत ३४ टक्के रुग्ण रक्तदाबाचे तर १९ टक्के रुग्ण डायबिटीसचे असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. या पार्श्वभूमीवर पालिका आता वॉर्डनिहाय घरोघरी रक्तदाब रुग्णांची तपासणी मोहीम राबवणार आहे. यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवून सहा हजार मशिन खरेदी केल्या जाणार आहेत. या मोहिमेत साडेतीन हजार कामगार, कर्मचारी कार्यरत राहणार असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर मुंबई महापालिकेने भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पायाभूत बाबींचे नियोजन व अंमलबजावणी केली जात आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाब व मधुमेह कमी वयापासून होतो आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात १८ ते ६९ वयोगटातील मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत. यात ३४ टक्के रुग्ण रक्तदाबाचे तर १९ टक्के रुग्ण डायबिटीसचे असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने रक्तदाब व मधुमेह याबाबतच्या तपासणीवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून भर देण्यात आला आहे. तसेच आरोग्य सेवा-सुविधांचे लोकसंख्या आधारित विश्लेषण हे विभागस्तरीय पद्धतीने केले जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in