बाप्पाच्या आगमनात रस्त्यावरील सिग्नल आणि केबल्सचा अडथळा; योग्य नियोजन करा - समन्वय समितीचे मुंबई पोलिस, BMC प्रशासनाला पत्र

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे २ ऑगस्टपासून दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारच्या दिवशी कार्यशाळेतून गणेश मूर्ती मंडपात नेणार आहेत.
बाप्पाच्या आगमनात रस्त्यावरील सिग्नल आणि केबल्सचा अडथळा; योग्य नियोजन करा - समन्वय समितीचे मुंबई पोलिस, BMC प्रशासनाला पत्र
Published on

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील गणेश मंडळे कार्यशाळेतून गणेशमूर्ती मंडपात घेऊन जात असताना सिग्नलच्या आडव्या पट्ट्या आणि लटकणारे केबल्स यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परेल वर्कशॉप व भारतमाता आणि डिलाईड रोडवरील केबल्स तसेच झाडांच्या फांद्यांचे योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाला केली आहे.

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे २ ऑगस्टपासून दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारच्या दिवशी कार्यशाळेतून गणेश मूर्ती मंडपात नेणार आहेत. यावेळी मंडळांकडून मोठ्या मिरवणुका काढण्यात येत असून, परंतु सिग्नलच्या आडव्या पट्ट्या आणि लटकणाऱ्या केबल्स यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

तसेच लालबाग परिसरातील वाहतूक तिसऱ्या मार्गाने फिरवण्याची आणि रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे विशेषतः डिलाईल रोड येथे सुद्धा आगमनच्या वाहतुकीवर परिणाम होत असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीने पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, वाहतूक पोलीस आदींना पत्राद्वारे दिली आहे.

लटकणाऱ्या केबल, सिग्नलचे पोल बदलण्याची मागणी

येत्या २ ऑगस्टपासून अनेक गणेशोत्सव मंडळे कार्यशाळेतून मूर्ती घेऊन जाण्यासाठी परेल आणि लालबाग कार्यशाळेत वाजतगाजत दाखल होणार आहेत. यादरम्यान आगमन आणि विसर्जन मार्गावर लटकणाऱ्या केबल्स, वाढलेल्या फांद्या तसेच भारतमाता, डिलाईल रोडवर असलेले सिग्नलचे पोल बदलण्याची मागणी समितीने केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in