Mumbai : लाडकी सफाई कर्मचारी बहीण योजना; दरवर्षी BMC करणार सन्मान, सभागृहाची मंजुरी

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महिला सफाई कामगारांची ओळख लाडकी कर्मचारी बहीण म्हणून होणार आहे.
Mumbai : लाडकी सफाई कर्मचारी बहीण योजना; दरवर्षी BMC करणार सन्मान, सभागृहाची मंजुरी
Published on

मुंबई  : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महिला सफाई कामगारांची ओळख लाडकी कर्मचारी बहीण म्हणून होणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी लाडकी कर्मचारी बहीण म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेविका दीक्षा कारकर यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेमला मंजुरी देत सभागृहात यावर एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या आणि वाढता कचरा यामुळे स्वच्छतेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र या मोहिमेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्याची मागणी दिशा ह. कारकर यांनी करून ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून दरवर्षी सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी केली होती.

कारकर यांनी मागणी केल्यानंतर अंजली नाईक, मेहेर हैदर, तृष्णा विश्वासराव, ॲड. सिद्धार्थ शर्मा, अजंता यादव, अश्रफ आझमी, लिना देहेरकर, श्रध्दा जाधव आदींनी चर्चा करून दत्तक वस्ती योजनेंतर्गत सफाई कामगारांना दिले जाणारे अल्प मानधन, त्यांचे आरोग्य आदींवर चर्चा करत या मागणीचे समर्थन केले. त्यावर महापौर रितू तावडे यांनी ठरावाची सूचनेला मंजुरी दिली.  पालिकेने या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित केल्यास त्यांच्या कामाला अधिक प्रेरणा मिळेल असे दीक्षा कारकर म्हणाल्या. 

logo
marathi.freepressjournal.in