Mumbai : वेरावली जलाशय टाकी दुरुस्तीचे काम लवकरच; २७ कोटी रुपये मंजूर

जोगेश्वरीच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या वेरावली जलाशय १ व २ या जुन्या टाक्या तात्काळ दुरुस्त करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने २७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या टाक्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरु होणार असून ते पूर्ण झाल्यावर प्रतापनगर, रामवाडी, शिवटेकडी, मजासगाव टेकडी, आनंद नगर तसेच अन्य भागात पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
Mumbai : वेरावली जलाशय टाकी दुरुस्तीचे काम लवकरच; २७ कोटी रुपये मंजूर
Published on

मुंबई : जोगेश्वरीच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या वेरावली जलाशय १ व २ या जुन्या टाक्या तात्काळ दुरुस्त करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने २७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या टाक्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरु होणार असून ते पूर्ण झाल्यावर प्रतापनगर, रामवाडी, शिवटेकडी, मजासगाव टेकडी, आनंद नगर तसेच अन्य भागात पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

या संदर्भात मुंबई वायव्य लोकसभा क्षेत्राचे खासदार रविद्र वायकर यांनी सातत्याने पत्रव्यवहार तसेच बैठका घेऊन पाठपुरावा केला होता. आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या के उत्तर कार्यालयात नुकतीच एक बैठक घेतली होती. या बैठकीला सहाय्यक आयुक्त महेश पाटील, एम.एम.आर.डी.एचे प्रफुल जमादार, एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी महेश काळे, जोगेश्वरी वाहतूक शाखेचे अधिकारी, ईमारत व प्रस्ताव विभाग, म्हाडा, मुंबई महागरपालिकेच्या अन्य विभागाचे अधिकारी, तसेच विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत, रचना सावंत, प्रियांका आंबोळकर, निखील प्रवीण शिंदे, बंड्या शिंदे, अनिरुद्ध नारकर, बंटी सावंत, दीप्ती वायकर पोतनीस, डॉ. राहुल महाले आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत एकूण २० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यात जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभिकरण करण्यासाठीचा प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे पाठवण्याचा निर्णय झाला. जोगेश्वरी (पूर्व) ते पंपहाउस (पूर्व) सर्विस रोडच्या रुंदीकरणाबरोबरच कोस्टल रोडपर्यंत एकच टेंडर काढण्यात आले आहे. परंतु ह्या कामास या टेंडर मधून वगळून याचे वेगळे टेंडर काढण्यात यावे अशी सूचना करण्यात आली. शंकरवाडी येथील उद्यानाच्या नुतनीकरनाच्या कामासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहे. याचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात होईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. मेट्रो सिनेमा येथील भुयारी मार्गाच्या धर्तीवर पश्चिम द्रुतगती मार्गावरील जे. व्ही. एल. आर सिग्नल येथील प्रस्तावित भुयारी मार्गाच्या कामासाठी मनपाकडून सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in