BMC Budget 2026 : बेस्टला पालिकेचा 'आधार'; १ हजार कोटींचे अनुदान

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमासाठी मुंबई महापालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बेस्टला पालिकेचा 'आधार'; १ हजार कोटींचे अनुदान
बेस्टला पालिकेचा 'आधार'; १ हजार कोटींचे अनुदान
Published on

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमासाठी मुंबई महापालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी पालिका प्रशासनाने वेळोवेळी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. जानेवारी २०१२-१३ पासून जानेवारी २०२६ पर्यंत तब्बल १२०२८.८१ कोटींची आर्थिक मदत केली आहे. तर यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाने हाती घेतलेले प्रकल्प यासाठी १ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने बेस्ट उपक्रमाला अदा करण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेला सद्यस्थितीत हाती घेतलेल्या प्रकल्पांसाठी आणि इतर महत्त्वाच्या उद्दिष्टांकरिता मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असतानाही, बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता, बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १ हजार कोटींची मदत देण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in