निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारावर पालिका मेहेरबान; आणखी दोन रस्त्यांची दिली कामे

मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागातील ८ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांपैकी केवळ ६ रस्त्याची कामे पूर्ण केलेल्या कंत्राटदारालाच पालिकेने शिल्लक राहिलेल्या निधीतून अन्य दोन रस्त्यांची कामे दिली आहे. तत्पूर्वी या कंत्राटदराने केलेल्या कामांपैकी काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने त्याच्याकडून या रस्त्याचे काम पुन्हा करून घेण्यात आले होते.
निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारावर पालिका मेहेरबान; आणखी दोन रस्त्यांची दिली कामे
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागातील ८ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांपैकी केवळ ६ रस्त्याची कामे पूर्ण केलेल्या कंत्राटदारालाच पालिकेने शिल्लक राहिलेल्या निधीतून अन्य दोन रस्त्यांची कामे दिली आहे. तत्पूर्वी या कंत्राटदराने केलेल्या कामांपैकी काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने त्याच्याकडून या रस्त्याचे काम पुन्हा करून घेण्यात आले होते. यामुळे या कंत्राटदारावार पालिका मेहेरबान का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने जी उत्तर विभागातील ८ रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली होती. यासाठी महापालिकेने मेसर्स आर्मस्ट्राँग या कंपनीची नियुक्ती केली होती. तब्बल ३३ कोटी रुपयांची ही कंत्राट कामे डिसेंबर २०२१ मध्ये मंजूर करण्यात आली. जानेवारी २०२२ मध्ये प्रत्यक्ष रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली. नियमानुसार २४ महिन्यामध्ये सदर कामे कंत्राटदाराला पूर्ण करायचे होते. परंतु मंजूर मार्गांपैकी केळुस्कर मार्ग आणि एम. बी. राऊत मार्गाचे काम स्थानिक रहिवाशी आणि मनसेच्या विरोधानंतर एप्रिल २०२४ रोजी रद्द करण्यात आले. त्यामुळे मंजूर कंत्राट निधीपैंकी काही निधी शिल्लक राहिला.

या कंत्राटदाराच्या कंत्राट कामांमधून दोन रस्त्यांची कामे वगळल्याने दोन नवीन रस्त्याची कामे त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे काकासाहेब गाडगीळ मार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी सुमारे ११ कोटी रुपये आणि पंडित सातवळेकर मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी सुमारे साडेसहा कोटी, तसेच पुरुषोत्तम गल्लीच्या कामांसाठी सुमारे १ कोटी रुपये अशाप्रकारे १८ ते १९ कोटी रुपयांची कामे संबंधित कंपनीला देण्यात आली. यामुळे पालिका या कंत्राटदारावर मेहेरबान का, असा सवाल केला जात आहे.

भटकी जनावरे पकडण्याचे कंत्राट कंपनीला !

मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या गुरे-ढोरे कोंडवाड्यांकरिता मनुष्यबळ पुरवण्यासाठी विद्युत कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी निविदा भरून काम पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विद्युत कामे करणारे कर्मचारी गुराढोरांना पकडण्यासाठी माणसे पुरवताना दिसणार आहेत. मुंबई महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाच्या वतीने भटक्या जनावरांना पकडण्यासाठी गुरे-ढोरे कोंडवाड्याकरिता खासगी कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. या निविदांमध्ये चक्क यांत्रिक व विद्युत विभागांतर्गत विद्युत संदर्भातील काम करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग घेतला.

logo
marathi.freepressjournal.in