BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ३ हजार रूपये वाढीव बोनस

गेल्यावर्षीपेक्षा यंदा ३ हजार रुपये वाढीव बोनस देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ३ हजार रूपये वाढीव बोनस
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी गुरुवारी जाहीर केला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा ३ हजार रुपये वाढीव बोनस देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळी बोनस देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेदेखील पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महापालिका कर्मचाऱ्यांना असे मिळेल सानुग्रह अनुदान

  • महापालिका अधिकारी/ कर्मचारी : ३१,००० रुपये

  • अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी : ३१,०००/-

  • महापालिका प्राथमिक शाळा, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक : ३१,०००/-

  • माध्यमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): ३१,०००/-

  • माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित) : ३१,०००/-

  • अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते/शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/ विनाअनुदानित) : ३१,०००/-

  • अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) : ३१,०००/-

  • सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (सीएचव्ही) : भाऊबीज भेट, रुपये १४,०००/-

  • बालवाडी शिक्षिका/मदतनीस : भाऊबीज भेट, रुपये ५,०००/-

logo
marathi.freepressjournal.in