३१ मेपर्यंत ७५ टक्के गाळ उपशाचे लक्ष : नाल्यातील गाळ उपशाची 'ऑन द स्पॉट' झाडाझडती - अभिजित बांगर

मिठी नदी, लहान व मोठे नाले यांच्या सफाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ५ एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या १९ दिवसांत महापालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून मिठी नदीचे ४८.५८ टक्के सफाई काम केले आहे. शहर व उपनगरांतील लहान-मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य असून, त्यापैकी २,२२,५९२.८३ मेट्रिक टन (२१.७८ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.
३१ मेपर्यंत ७५ टक्के गाळ उपशाचे लक्ष : नाल्यातील गाळ उपशाची 'ऑन द स्पॉट' झाडाझडती -  अभिजित बांगर

मुंबई : ३१ मे पर्यंत लहान-मोठ्या नाल्यातील ७५ टक्के गाळ उपसा करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी मेजर नाल्यातील गाळ उपसा करण्याचे काम रात्रीच्या शिफ्टमध्ये आहे. गाळ उपसा करणे, गाळ वाहून नेणे यावर जीपीएस सिस्टमच्या माध्यमातून लक्ष आहे. परंतु प्रत्यक्षात काम होणाऱ्या ठिकाणी पालिकेच्या वॉर्डचे अधिकारी, सुपरवायझर सरप्राइज व्हिजीट करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अभिजित बांगर यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला सुरुवात होते. गेल्या वर्षी ६ मार्चपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आणि मुंबई महापालिकेला टीकेचा सामना करावा लागला. यंदाही नालेसफाईच्या कामाला १८ मार्च नंतर सुरू झाली असून, मार्च महिन्यात ५ टक्के, एप्रिल महिन्यात ३० टक्के आणि मे अखेरपर्यंत ४० टक्के असे एकूण ७५ टक्के गाळ उपसा करण्याचे लक्ष्य आहे. पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांचे ही पावसाळ्यापूर्वी कामावर लक्ष असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नालेसफाईचे काम प्रगतिपथावर असल्याचे अभिजित बांगर यांनी सांगितले.

मिठी नदी, लहान व मोठे नाले यांच्या सफाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ५ एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या १९ दिवसांत महापालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून मिठी नदीचे ४८.५८ टक्के सफाई काम केले आहे. शहर व उपनगरांतील लहान-मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य असून, त्यापैकी २,२२,५९२.८३ मेट्रिक टन (२१.७८ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. गाळ उपसा करण्याच्या कामावर लक्ष असून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांवर जीपीएस सिस्टमच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. तरीही अधिकाऱ्यांनी पहाणी केल्यास काम अधिक लवकर व योग्य प्रकारे होते. त्यामुळे पालिकेच्या वॉर्ड स्तरावरील सुपरवायझर हे सरप्राइज व्हिजीट करणार असून पहाणीत काही दिरंगाई निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'असे' होतेय गाळ उपसा करण्याचे काम

  • शहरातील नाल्यातील ३० हजार ९३९.९४ टक्के गाळ उपसा करणे असून ५ एप्रिलपर्यंत ३,०१९.१९ मेट्रिक टन (९.७६ टक्के) गाळ उपसा केला.

  • पूर्व उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत १,२३,५५३.०५ मे.टन गाळ काढणे अपेक्षित असून, आतापर्यंत त्यापैकी २५,३६३.७२ मे.टन (२०.५३) टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.

  • पश्चिम उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत २,३५,०२०.९४ मे.टन गाळ काढणे अपेक्षित असून, आतापर्यंत त्यापैकी ४३,४५७.९३ मे.टन ( १८.४९ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in