BMC Election : भाजपचे ६६ उमेदवार जाहीर; नील सोमय्या यांना उमेदवारी

मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वंच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर करताना सावध भूमिका घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अंतिम दिवस असून सोमवारी भाजपने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर दुसरी यादी रात्री उशिरा जाहीर करण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
BMC Election : भाजपचे ६६ उमेदवार जाहीर; नील सोमय्या यांना उमेदवारी
BMC Election : भाजपचे ६६ उमेदवार जाहीर; नील सोमय्या यांना उमेदवारी Photo : X (Kirit Somaiya)
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वंच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर करताना सावध भूमिका घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अंतिम दिवस असून सोमवारी भाजपने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर दुसरी यादी रात्री उशिरा जाहीर करण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला २२७ पैकी दीडशेहून अधिक जागा लढण्याची भाजपची तयारी होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी झाली होती. शिवसेनेने याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर दोन्ही पक्षात गेले ८ ते १० दिवस बैठकांचे सत्र सुरू होते. अखेर भाजप आणि शिवसेनेत २०७ जागांवर एकमत झाले असून २०७ जागांपैकी १२८ जागा भाजप लढवणार आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला ७९ जागा आल्या आहेत. असे असले तरी अद्यापही २० जागांवर दोन्ही पक्षांमध्ये तोडगा निघालेला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक १३५ मधून उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक ४७ मधून, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक ९ मधून आणि माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक १० मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in