मुंबईच्या निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा; सर्वच पक्षांकडून घरातच उमेदवारी

निष्ठावंत कार्यकर्त्यांची निवडणूक असा टेंभा सूर सर्वंच राजकीय पक्षांचे नेते मिरवतात. मात्र १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांकडून घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे.
मुंबईच्या निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा; सर्वच पक्षांकडून घरातच उमेदवारी
मुंबईच्या निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा; सर्वच पक्षांकडून घरातच उमेदवारी
Published on

मुंबई : निष्ठावंत कार्यकर्त्यांची निवडणूक असा टेंभा सूर सर्वंच राजकीय पक्षांचे नेते मिरवतात. मात्र १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांकडून घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे सेना आदींनी घरातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असले तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे देशभरातील लोकांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे यंदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे व शिवसेनेची युती झाली आहे. मराठी माणूस, महाराष्ट्र हितासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, असा दावा ठाकरे बंधूंनी केला आहे.

तर दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. परंतु यात नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

राजकारणात नेहमी घराणेशाहीवर टीका केली जाते. देशातील अनेक राजकीय पक्ष घराणेशाहीच्या विरोधात आहेत. मात्र जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये एकाच घरातील अनेकांना उमेदवारी दिली जाते.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपने नेत्यांच्या घरातील उमेदवारांना तिकीट जाहीर केले आहे.

या पक्षात नातेवाईकांना उमेदवारी

शिवसेना ठाकरे पक्ष

  • आमदार सुनील प्रभू – अंकित सुनील प्रभू (मुलगा)

  • माजी नगरसेवक चंगेज मुल्तानी – झीशान मुल्तानी (मुलगा)

  • आमदार हारून खान – सबा हारून खान

  • आमदार प्रकाश फातर्पेकर – सुप्रदा फातर्पेकर

  • आमदार मनोज जामसुतकर – सोनम जामसुतकर

  • विठ्ठल लोकरे – सुनंदा लोकरे

अजित पवारांची राष्ट्रवादी

  • आमदार नवाब मलिक – सज्जू मलिक, कप्तान मलिक, डॉ. सईदा खान, बुशरा परवीन मलिक

  • माजी नगरसेवक मोहन पवार – अक्षय मोहन पवार

भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट

  • माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांची पत्नी– संगीता ज्ञानमूर्ती शर्मा

  • माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा– नील सोमय्या

  • माजी मंत्री राज पुरोहित – आकाश पुरोहित

  • सभापती राहुल नार्वेकर यांचे बंधू व बहिण– मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर

logo
marathi.freepressjournal.in