BMC Election : मुंबईत MIMची मुसंडी; ६ जागांवर विजय, प्रथमच एमएमआयचा गटनेता होणार

मुंबई महापालिका निवडणुकीत काही अनपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागले आहेत. एमएमआयचे मागील २०१७ च्या निवडणुकीत दोन नगरसेवक निवडून आले होते. यातील एका नगरसेवकाने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
BMC Election : मुंबईत MIMची मुसंडी; ६ जागांवर विजय, प्रथमच एमएमआयचा गटनेता होणार
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले होते. परंतु तब्बल ९ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत एमआयएमने मुसंडी घेतली आहे. २०१७ मध्ये एमआयएमचे २ नगरसेवक निवडून आले होते. मात्र २०२६ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत एमआयएमचे ६ नगरसेवक निवडून आल्याने एमआयएमला प्रथमच गटनेते पद मिळणार आहे.

मुंबई महापालिकेत एमएमआयचे सहा उमेदवार विजयी

मुंबई महापालिका निवडणुकीत काही अनपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागले आहेत. एमएमआयचे मागील २०१७ च्या निवडणुकीत दोन नगरसेवक निवडून आले होते. यातील एका नगरसेवकाने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

पाच नगरसेवक असतील तर गटनेतेपद मिळते. समाजवादी पक्षाचे ७ नगरसेवक असल्याने नियमानुसार पक्षाला गटनेतेपद मिळाले होते. मात्र, सपाचे यावेळी दोनच उमेदवार निवडून आले होते. सपाची जागा आता एमएमआयने घेत सहा नगरसेवक निवडून आले आहेत. यात प्रभाग क्रमांक त्यामुळे सपासह काँग्रेसलाही हा मोठा धक्का मानला जातो आहे.

एमआयएमचे विजयी उमेदवार

  • प्रभाग क्र. १४५ - खैरुनिसा हुसैन

  • प्रभाग क्र. १३६ - जमीर कुरेशी

  • प्रभाग - १३७ - समीर पटेल

  • प्रभाग - १३९ - शबाना शेख

  • प्रभाग - १३८ - रोशन शेख

  • प्रभाग - १३४ - मेहजबीन अहमद खान

logo
marathi.freepressjournal.in