BMC Election : ठाकरेंकडे वरळीचा गड; ७ पैकी ६ जागांवर वर्चस्व

वरळी विधानसभा क्षेत्रातील सात प्रभागांपैकी सहा प्रभागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आपला गड राखला आहे.
BMC Election : ठाकरेंकडे वरळीचा गड; ७ पैकी ६ जागांवर वर्चस्व
Published on

मुंबई : ठाकरे बंधूंसाठी अस्तित्त्वाची लढाई असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. तसेच ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीतही ठाकरेंनी बाजी मारली आहे. वरळी विधानसभा क्षेत्रातील सात प्रभागांपैकी सहा प्रभागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आपला गड राखला आहे. या मतदारसंघातील केवळ एका प्रभागामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दक्षिण मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघ हा अतिशय चुरशीचा मानला जात होता. या मतदारसंघात प्रभाग क्रमांक १९३ ते १९९ असे महानगरपालिकेचे सात प्रभाग येतात. या सात प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १९३ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हेमांगी वरळीकर प्रभाग क्रमांक १९४ मध्ये निशिकांत शिंदे, प्रभाग क्रमांक १९५ मध्ये विजय भनगे ,प्रभाग क्रमांक १९६ मध्ये पद्मजा चेंबूरकर , प्रभाग क्रमांक १९८ मध्ये अबोली खाडे आणि प्रभाग क्रमांक १९९ मध्ये किशोरी पेडणेकर विजयी झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक १९७ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वनिता नरवणकर यांनी मनसेच्या रचना साळवी या उमेदवाराला पराभूत करीत विजय मिळवला आहे. त्यामुळे या मतदारसंघात स्थानिक आमदार असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या सहाही उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे.

logo
marathi.freepressjournal.in