निवडणुक प्रशिक्षणाला दांडी ठरू शकते महागात; EVM हाताळणीपासून मॉक पोलपर्यंत काटेकोर तयारी

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया निर्दोष आणि पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महानगरपालिकेने दिला आहे.
निवडणुक प्रशिक्षणाला दांडी ठरू शकते महागात; EVM हाताळणीपासून मॉक पोलपर्यंत काटेकोर तयारी
निवडणुक प्रशिक्षणाला दांडी ठरू शकते महागात; EVM हाताळणीपासून मॉक पोलपर्यंत काटेकोर तयारी
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया निर्दोष आणि पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महानगरपालिकेने दिला आहे. मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचारी हे संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा कणा असल्याने, त्यांच्या प्रशिक्षणात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षण सत्रांना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे महानगरपालिका विभागाला कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तात्काळ निवडणूक महानगरपालिकेच्या वतीने २९ डिसेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत मुंबईतील सात ठिकाणी निवडणूक प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (२७ डिसेंबर) महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृहात अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण बैठक पार पडली.

मतदान प्रक्रियेत ईव्हीएमची अचूक हाताळणी, मॉक पोलची कार्यपद्धती, मतदान साहित्याचे व्यवस्थापन आणि मतदानानंतरची प्रक्रिया यांमध्ये झालेली छोटी चूकही निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते, याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपली भूमिका, जबाबदारी आणि अधिकार स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी प्रशिक्षण सत्रात संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी राबविण्यात येणाऱ्या सर्व टप्यांचे तांत्रिक मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती दिली. यामध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मॉक पोल तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश असेल.

उपजिल्हाधिकारी अंजली भोसले असून, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चार बैठकीत करण्यात आला. बैठकीस सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in