

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान सुरळीत व्हावे आणि मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी आज, १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून सर्व बँका, केंद्र व राज्य सरकारची कार्यालये बंद राहतील.
काय बंद राहणार?
केंद्र व राज्य सरकारची कार्यालये
निमशासकीय कार्यालये
महामंडळे व मंडळे
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU)
बँका
बीएमसी हद्दीतील केंद्र सरकारची कार्यालये
खासगी कार्यालये त्यांच्या अंतर्गत धोरणानुसार निर्णय घेतील; मात्र अनेक ठिकाणी सुट्टी राहण्याची शक्यता आहे.
शाळा आणि महाविद्यालये
महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व आणि बहुतेक खाजगी शाळा व महाविद्यालये बंद. शाळा-महाविद्यालयांच्या अनेक इमारती मतदान केंद्र म्हणून वापरात.
शेअर बाजार
BSE आणि NSE या दोन्ही शेअर बाजारांना १५ जानेवारी रोजी पूर्ण सुट्टी
इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि ई-गोल्ड व्यवहार बंद
दारूबंदी (ड्राय डे)
१३ ते १६ जानेवारी या कालावधीत ४ दिवसांचा ड्राय डे
दारूची विक्री व सेवनास पूर्णतः बंदी
काय सुरू राहणार?
अत्यावश्यक सेवा:
रुग्णालये, रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन सेवा पूर्णतः कार्यरत
सार्वजनिक वाहतूक:
BEST बस, मुंबई लोकल रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा नेहमीप्रमाणे सुरू
मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी अतिरिक्त व्यवस्था केली जाऊ शकते.