बचत गटाच्या महिलांना जीएसटीचे प्रशिक्षण; GST बिल मिळवणे होणार एकदम सुलभ; BMC च्या एफ-दक्षिण विभागाचा उपक्रम

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बचतगट कार्यरत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांची आता जीएसटी बिलाची अडचण दूर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्यावतीने महिला बचत गटांना जीएसटीचे बिल प्राप्त करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
बचत गटाच्या महिलांना जीएसटीचे प्रशिक्षण; GST बिल मिळवणे होणार एकदम सुलभ; BMC च्या एफ-दक्षिण विभागाचा उपक्रम
बचत गटाच्या महिलांना जीएसटीचे प्रशिक्षण; GST बिल मिळवणे होणार एकदम सुलभ; BMC च्या एफ-दक्षिण विभागाचा उपक्रम
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बचतगट कार्यरत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांची आता जीएसटी बिलाची अडचण दूर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्यावतीने महिला बचत गटांना जीएसटीचे बिल प्राप्त करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यात प्रशिक्षण कार्यक्रम सुरूच राहील, अशी माहिती एफ दक्षिण विभागाच्या साहाय्यक आयुक्त वृषाली इंगुले यांनी दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये संचालक (नियोजन) प्राची जांभेकर यांच्या विभागामार्फत प्रत्येक विभाग कार्यालयामधून गरीब व गरजू महिलांचे बचत गट बनवले जातात. त्यामधील महिला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटेमोठे व्यवसाय करतात. यातूनच त्यांना सरकारी कार्यालय, महापालिका अशा मोठमोठ्या विभागातील ऑर्डर मिळतात.

बचत गटांना मार्गदर्शन

जेव्हा शासकीय व कॉर्पोरेट विभागातील ऑर्डर मिळतात तेव्हा त्यांच्याकडे जीएसटी बिलाची मागणी केली जाते. अशावेळी महिलांकडे जीएसटी बिल नसल्यामुळे ती त्या ऑर्डर घेऊ शकत नाही. तसेच विविध टेंडर मिळवण्यासाठी ही जीएसटी बिलाची आवश्यकता असते. महिला बचत गटांतील महिलांची ही ही समस्या दूर करण्यासाठी नियोजन व मुंबई महापालिकेच्या एफ-दक्षिण विभागाच्यावतीने सर्व विभाग कार्यालयातील व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी जीएसटी या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले होते.

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांना याबाबत असलेल्या शंकाचे निरसन केले तसेच ज्या इच्छुक महिलांना भविष्यात पोर्टलवर नोंदणी करायची आहे व स्वतः रिर्टन कसे भरायचे आहे त्यांच्यासाठी पुन्हा शिबिर घेऊन माहिती देण्यात येईल, असे सांगितले. या मार्गदर्शनपर शिबिराला ११० महिला विविध विभागातून हजर होत्या. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोणतीही अडचण असल्यास जीएसटी विभागातून मदत केली जाईल, असे जीएसटी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in