Mumbai : रस्ते खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना ३७ कोटींचा दंड; वसुली केवळ १६ कोटींची

खड्डेमुक्त मुंबईसाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर मुंबई महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. दोन टप्प्यात रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असून कामात दिरंगाई, वेळकाढूपणा करणाऱ्या कंत्राटदारांना तब्बल ३७ कोटी ५७ लाखांचा दंड ठोठावला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

गिरीश चित्रे / मुंबई

खड्डेमुक्त मुंबईसाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर मुंबई महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. दोन टप्प्यात रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असून कामात दिरंगाई, वेळकाढूपणा करणाऱ्या कंत्राटदारांना तब्बल ३७ कोटी ५७ लाखांचा दंड ठोठावला आहे. मुंबईकरांना मजबूत व टिकाऊ रस्ते देण्यासाठी पालिका प्रशासन कटीबद्ध असून कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या रस्ते विभागाने दिला आहे. दरम्यान, ३७.५७ कोटींचा दंड ठोठावला असला तरी प्रत्यक्षात १६ कोटी ३३ लाख रुपये वसूल करण्यात आले असून २१ कोटी रुपयांचा दंड वसूल करणे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सिमेंट काँक्रीटचे रस्ते दोन टप्प्यात करण्यात येत असून सुमारे १२ हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

खड्डेमुक्त मुंबईतील रस्त्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार दोन टप्प्यात सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे.

मात्र काँक्रीटचे रस्ते करताना निकृष्ट दर्जाचे काम, कामात दिरंगाई, वेळकाढूपणा यामुळे १० कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात फेज वन व फेज टू मध्ये एकूण ३७ कोटी ५७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

सीसी फेज वन

  • ३.७६ कोटी दंड, त्यापैकी २.६६ कोटी वसूल; १.०७ कोटी वसूल करणे बाकी.

  • ५.७५ कोटी दंड, केवळ ०.६५ कोटी वसूल; ५.१० कोटी वसूल करणे बाकी.

  • ७.०४ कोटी दंड, १.०२ कोटी वसूल; ६.०२ कोटी वसूल करणे बाकी.

  • सर्वाधिक १७.२१ कोटी दंड, ९.७८ कोटी वसूल; ७.४३ कोटी वसूल करणे बाकी.

फेज टू अंतर्गतही अनेक कंत्राटदारांवर कारवाई

  • ०.८५ कोटी दंड; ०.३४ कोटी वसूल करणे

  • ०.६७ कोटी दंड; ०.३३ कोटी वसूल करणे

  • १.०२ कोटी दंड; ०.३९ कोटी वसूल करणे

  • ०.३४ कोटी दंड; ०.३० कोटी वसूल करणे

logo
marathi.freepressjournal.in