मुंबईतील ९३ बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस; १३५ बांधकाम साइटना कारणे दाखवा नोटीस; २६ दिवसांत पालिकेची कारवाई

हवेतील गुणवत्ता खालावणे, प्रदूषणात कारणीभूत ठरणाऱ्या ९३ बांधकाम साईट्सना 'स्टॉप वर्क' नोटीस बजावण्यात आली आहे. तर १३५ बांधकाम साईटना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबईतील ९३ बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस; १३५ बांधकाम साइटना कारणे दाखवा नोटीस; २६ दिवसांत पालिकेची कारवाई
मुंबईतील ९३ बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस; १३५ बांधकाम साइटना कारणे दाखवा नोटीस; २६ दिवसांत पालिकेची कारवाई
Published on

मुंबई : हवेतील गुणवत्ता खालावणे, प्रदूषणात कारणीभूत ठरणाऱ्या ९३ बांधकाम साईट्सना 'स्टॉप वर्क' नोटीस बजावण्यात आली आहे. तर १३५ बांधकाम साईटना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण व हवामान बदल विभाग तसेच प्रशासकीय विभागनिहाय (वॉर्ड) २ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील विविध प्रभागांमध्ये एकूण १,०८२ बांधकाम ठिकाणी झाडाझडती घेतली.

महापालिकेच्या विभाग तपासणी स्तरावर केलेल्या दरम्यान खासगी बांधकामे, महानगरपालिकेची कामे तसेच इतर विकास प्राधिकरणांची कामे यांची स्वतंत्र वर्गवारी करण्यात आली. याच कालावधीत काही बांधकामांच्या ठिकाणी पर्यावरण नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे आढळून आले. तसेच ४८ जणांना बजाविण्यात आलेली काम थांबविण्याची नोटीस मागे घेण्यात आली आहे.

रस्त्यांची सखोल स्वच्छता

हवेतील धुलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने सार्वजनिक रस्ते आणि इतर ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवली आहे. पाण्याच्या टँकरद्वारे १,४५४.०९ किलोमीटर अंतराएवढ्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच ६८४.८ किलोमीटर अंतरावरील रस्त्यांवर मिस्टिंग मशिन्सचा वापर करण्यात आला.

पर्यावरणाचे संवर्धन साधण्यासाठी उपाययोजना

पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केवळ दंडात्मक नव्हे तर प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. हवेची गुणवत्ता आरोग्यदायी ठेवणे आणि पर्यावरण संवर्धन साधणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in