लघुलेखकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देणारच; मुंबई महानगरपालिका संघटना आक्रमक

मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेने कनिष्ठ लघुलेखक पदावरील कर्मचाऱ्यांना पे-बँड व ग्रेड-पे संदर्भात होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात संघटनेने सर्व कनिष्ठ लघुलेखकांना सूचना जारी करत आयुक्तांशी चर्चा आणि गरज पडल्यास न्यायालयीन लढा देण्याचा इशारा दिला आहे.
लघुलेखकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देणारच; मुंबई महानगरपालिका संघटना आक्रमक
लघुलेखकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देणारच; मुंबई महानगरपालिका संघटना आक्रमक(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेने कनिष्ठ लघुलेखक पदावरील कर्मचाऱ्यांना पे-बँड व ग्रेड-पे संदर्भात होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात संघटनेने सर्व कनिष्ठ लघुलेखकांना सूचना जारी करत आयुक्तांशी चर्चा आणि गरज पडल्यास न्यायालयीन लढा देण्याचा इशारा दिला आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, कनिष्ठ लघुलेखकांच्या वेतनश्रेणीबाबत डॉ. रामनाथ झा बृहन्मुंबई समितीसमोर तीन वेळा बाजू मांडण्यात आली. मात्र राज्य शासनात संबंधित पदासाठी १०० शब्द प्रति मिनिट वेगाची अट असताना, महानगरपालिकेत ही मर्यादा ८० शब्द प्रति मिनिट (मराठी व इंग्रजी) असल्याचे कारण पुढे करून पे-बँड-२ आणि ४,३०० रुपये ग्रेड-पेचा लाभ देण्यास नकार देण्यात आला आहे. या निर्णयामुळे कनिष्ठ लघुलेखकांवर अन्याय झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेने अखेरचा प्रयत्न म्हणून महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त (शहर) यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

औद्योगिक न्यायाधिकरणाकडे दाद मागणार

संघटनेने स्पष्ट केले आहे की, चर्चेतून समाधानकारक तोडगा न निघाल्यास औद्योगिक न्यायाधिकरणाकडे दाद मागितली जाईल तसेच कनिष्ठ लघुलेखकांना राज्य शासनाप्रमाणेच पे-बँड व ग्रेड-पे मिळवून देण्यासाठी संघटना शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे मुंबई महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in