BMC Mayor : मुंबईच्या महापौरांची निवड कधी होणार? महत्त्वाची माहिती समोर

मुंबई महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर मुंबईचा महापौर कोण? याची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीने ११८ जागा म्हणजे बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे महापौर महायुतीचा होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र...
BMC Mayor : मुंबईच्या महापौरांची निवड कधी होणार? महत्त्वाची माहिती समोर
Published on

मुंबई : सर्वांना प्रतीक्षा असलेल्या मुंबई महापौरपदासाठीची निवडणूक येत्या ३१ डिसेंबरला घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या २२ जानेवारीला आरक्षण सोडत पार पडल्यानंतर सभागृहात महापौरपद निवडणूक घेऊन महापौरपदाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. महापौर विराजमान झाल्यानंतर याच दिवशी विद्यमान महापौरांकडून उपमहापौर, सभागृह नेता, गटनेते पदाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत पक्षाकडून महापौरपदाचा उमेदवार ठरला नाही, तर २ फेब्रुवारी रोजी पालिका सभागृहात महापौरपदाची निवडणूक पार पडेल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, वैधानिक समित्यांसह इतर समित्यांची प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर मुंबईचा महापौर कोण? याची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीने ११८ जागा म्हणजे बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे महापौर महायुतीचा होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र महापौर कोण होणार हे आरक्षण सोडतीनंतरच संबंधित पक्षाला ठरवावे लागणार आहे.

फेबुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात प्रक्रिया पार पडणार

महापौर विराजमान झाल्यानंतर स्थायी समिती, शिक्षण समिती तसेच वैधानिक समित्यांची निवड केली जाते. सर्वात आधी स्थायी समिती, शिक्षण समिती नियुक्त करावी लागते. त्यानंतर इतर वैधानिक समित्यांची नियुक्ती केली जाते. ही प्रक्रिया फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेच्या चिटणीस विभागाने केले आहे.

अर्थसंकल्प लांबणार?

मुंबई महापालिका अर्थसंकल्प नियमानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ४ फेब्रुवारीपर्यंत मांडला जाणे बंधनकारक आहे. मात्र समित्यांची निवड प्रक्रियेला उशीर होणार असल्याने काही दिवस पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in