
मुंबई : बॉलीवूड अभिनेते आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांना मालाड परिसरात कथित अवैध बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पी-नॉर्थ’ वॉर्डने मिथुन यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
‘बीएमसी’च्या अहवालानुसार, या तात्पुरत्या युनिट्समध्ये विटा, लाकडी फळ्या, काचेच्या भिंती आणि एसी शीट छतांचा वापर करण्यात आला आहे, जे बांधकाम नियमांचे उल्लंघन मानले जाते. या सूचनेला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम ‘४७५ अ’अंतर्गत कायदेशीर कारवाई करून या बांधकामांवर कारवाई केली जाईल, असा इशारा ‘बीएमसी’ने दिला आहे.
यावर मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, “माझे कोणतेही बेकायदेशीर बांधकाम नाही. अशा नोटिसा अनेक लोकांना पाठवण्यात आल्या आहेत आणि आम्ही आमचे उत्तर पाठवत आहोत. ‘बीएमसी’ने नोटीस पाठवून कोणालाही वैयक्तिकरित्या लक्ष्य केलेले नाही. हा ‘बीएमसी’च्या व्यापक कारवाईचा एक भाग आहे.”