BMC On Air Pollution & Masks: प्रसार माध्यमांतून केला गेलेला 'तो' दावा खोटा ; मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं खंडन

माध्यमातून आलेल्या वृत्तांमध्ये महापालिकेने तसं आवाहन केल्याचा दावा केला जात होता.
BMC On Air Pollution & Masks: प्रसार माध्यमांतून केला गेलेला 'तो' दावा खोटा ; मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं खंडन

मुंबई शहरात हवेची गुणवत्ता कमी झाली असली तरी आपण मास्क वापरण्याबाबत कोणत्याही प्रकारचं आवाहन नागरिकांना केलं नसल्याची माहिती मुंबई महापालिका म्हणजे बीएमसीने दिली आहे. मुंबई शहरात घसरलेल्या हवेच्या निर्देशांकाचा दाखला देत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहिती आणि काही प्रसारमाध्यमांमधून आलेल्या वृत्तामध्ये महापालिकेने तसं आवाहन केल्याचा दावा केला जात होता. मात्र, प्रसार माध्यमांतून आलेल्या वृत्तामध्ये महापालिकेने तसं आवाहन केल्याचा दावा केला जात होता. मात्र, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया यांच्यामाध्यमातून आलेल्या कोणत्याही सूत्रांचा अथवा माहितीच्या आधारे केल्या जाणाऱ्या दाव्यात तथ्य नसल्याचं सांगत बीएमसने हे दाव्याच्या वृत्ताचं खंडण केलं आहे. महापालिकेने एक पत्रक प्रसिद्धी करत याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी नागरिकांना श्वसनाची संबंधित आजार होऊ लागले आहेत. अशा स्थितीत सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या चेहऱ्याला मास्क लावावे. असं आवाहन मुंबई महापालिकेने केल्याचा दावा केला जात होता. या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे.

मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, शहरातील हवेची गुणवत्त घसरली आहे. हवेचा निर्देशांक कमालीचा खाली आला आहे हे खरं आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून विचारविनीमय सरु आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसंच नागरिकांना मास्क वापरण्यासंदर्भात कोणतंही आवाहन, सूचना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे समाज माध्यमांतून पालिकेच्या नावाने केले जाणारे दावे पूर्णपणे निराधार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in