Mumbai : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; साकीनाका, पवईत 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत एल विभागाची कारवाई

पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाला वेग आला असून साकीनाका, पवई व साकीविहार रोड परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. या कारवाईत पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडथळा ठरणारे बेकायदा स्टॉल, दुकाने व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली.
Mumbai : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; साकीनाका, पवईत 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत एल विभागाची कारवाई
Mumbai : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; साकीनाका, पवईत 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत एल विभागाची कारवाई
Published on: 

मुंबई : पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाला वेग आला असून साकीनाका, पवई व साकीविहार रोड परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. या कारवाईत पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडथळा ठरणारे बेकायदा स्टॉल, दुकाने व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली.

पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ५० टक्के मुंबईकर पायीच प्रवास करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना मोकळे फुटपाथ मिळावे यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतून पादचारी प्रथम अभियान राबविण्यात येत आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या २६ विभागीय कार्यालय क्षेत्रात फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार कुर्ला एल विभागातही 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पालिकेच्या परिमंडळ ५च्या उपायुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एल विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. फुटपाथवर अतिक्रमण करून पादचाऱ्यांच्या हक्काची जागा बळकावणाऱ्यांविरोधात महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

फुटपाथ मोकळे ठेवण्यास प्राधान्य

फुटपाथवरील अतिक्रमणांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. यापुढेही अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरू राहणार असून पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे ठेवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे सहाय्यक आयुक्त अनिल जाधव यांनी सांगितले.

पादचाऱ्यांची तारांबळ

शहरातील फुटपाथ हे पादचाऱ्यांसाठी असताना त्यावर अनधिकृत बांधकामे, दुकाने, स्टॉल आणि विविध प्रकारचे अडथळे निर्माण करण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. या पार्श्वभूमीवर ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in