गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांचे विघ्न दूर होणार; BMC मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवणार

मुंबईत सलग पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात याच खड्ड्यांवरून प्रवास करायचा का? असा सवाल संतप्त नागरिक पालिकेला विचारत आहेत. यावर गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवून मुंबईकरांना चांगले रस्ते देणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईत सलग पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात याच खड्ड्यांवरून प्रवास करायचा का? असा सवाल संतप्त नागरिक पालिकेला विचारत आहेत. यावर गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवून मुंबईकरांना चांगले रस्ते देणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.

पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा घाट घातला. परंतु केवळ ४९.०७ टक्के रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून करण्यात येणार आहेत. दरम्यान, काँक्रीटीकरण केल्यानंतरही रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’चीच आहे. तर पालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे अ‍ॅप विकसित केले असून या अ‍ॅपवर नागरिकांच्या तक्रारीचा पाऊस पडत आहे. त्यानुसार आतापर्यंत पालिकेकडे खड्ड्यांविषयीच्या १० हजार ८०६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑगस्टमध्ये तीन हजार ३५९ खड्डे निदर्शनास आले आहेत. एकूण खड्ड्यांच्या तक्रारींपैकी नऊ हजार २१२ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, तर उर्वरित खड्ड्यांचे निवारण गणेशोत्सवापूर्वी करण्यात येणार आहे.

या भागात सर्वाधिक खड्डे

मुंबईच्या अंधेरी, भांडुप, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वांद्रे बस स्थानक, परळ, दादर, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, चारकोप, मालाड या भागात सर्वाधिक खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिका मास्टिक अस्फाल्टचा वापर करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in