मालमत्ता कर वसुलीप्रकरणी ३८ जणांचे चेक बाऊन्स; न्यायालयात खेचले; ८५३ मालमत्ताधारकांचे धनादेश वटले

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत धनादेशाद्वारा करभरणा केलेल्या ८९२ प्रकरणात प्रत्यक्षात धनादेशांचा अनादर झाल्याचे आढळून आले. यात एकूण ४३ कोटी ५४ लाख रुपयांचा मालमत्ता कर अपेक्षित होता. धनादेशाचा अनादर झाल्याने या ८९२ जणांना पालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली.
मालमत्ता कर वसुलीप्रकरणी ३८ जणांचे चेक बाऊन्स; न्यायालयात खेचले; ८५३ मालमत्ताधारकांचे धनादेश वटले
Published on

मुंबई : मालमत्ता कर भरण्यास चालढकल करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेकडून थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ८९२ मालमत्ताधारकांनी धनादेश जमा केला होता. यापैकी ८५३ मालमत्ताधारकांचे धनादेश वटले असून ३७ कोटी ८३ लाखांचा कर रूपात महसूल जमा झाला आहे. मात्र उर्वरित ३८ मालमत्ताधारकांचे चेक बाऊन्स झाल्याने परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ अनुसार, न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

मालमत्ताधारकांना कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी रोखीने देयक जमा करण्यासोबतच धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाईन पद्धत ही सुविधा उपलब्ध केली आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत धनादेशाद्वारा करभरणा केलेल्या ८९२ प्रकरणात प्रत्यक्षात धनादेशांचा अनादर झाल्याचे आढळून आले. यात एकूण ४३ कोटी ५४ लाख रुपयांचा मालमत्ता कर अपेक्षित होता. धनादेशाचा अनादर झाल्याने या ८९२ जणांना पालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर ८५३ मालमत्ताधारकांनी एकूण ३७ कोटी ८३ लाख रुपयांचा करभरणा केला. मात्र, नोटीस बजावल्यानंतर करभरणा न केल्याने उर्वरित ३८ जणांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

‘टॉप टेन’ मालमत्ता करधारकांकडून कर वसुली

  •  रजनीकांत देविदास श्रॉफ (डी विभाग) - ४३ कोटी ११ लाख ०१ हजार ९८८ रुपये

  •  एस. जी. जैन आणि सी. बी. जैन ( एम पश्चिम विभाग) - ०५ कोटी ४४ लाख ०६ हजार ४७९ रुपये

  •  सृष्टीराज डेव्हलपर्स (के पूर्व विभाग) - ०४ कोटी ७१ लाख ९७ हजार २७४ रुपये

  •  उषा मधू डेव्हलपमेंट (पी दक्षिण विभाग) - ०४ कोटी ३८ लाख ४४ हजार ४७६ रुपये

  •  टॉपवर्थ प्रॉपटीज प्रा. लि (जी दक्षिण विभाग) - ०४ कोटी ३७ लाख ९९ हजार २१२ रुपये

  •  अलमगीर अली मोहम्मद मलकानी आणि अन्य (पी उत्तर विभाग) - ०४ कोटी ३२ लाख ४२ हजार २६६ रुपये

  •  गूडबिल्ट इंडिया प्रा. लि ( पी दक्षिण विभाग) - ०३ कोटी ८७ लाख ५६ हजार ३३९ रुपये

  •  जयश्री बिल्डर्स ( एस विभाग) - ०३ कोटी ८१ लाख ९५ हजार १२५ रुपये

  •  सहयोग होम्स लिमिटेड (के पश्चिम विभाग) - ०३ कोटी ७५ लाख ६९ हजार ८६४ रुपये

  •  सत्यभामा एन आचार्य (एम पश्चिम विभाग) - ०२ कोटी ५९ लाख ४१ हजार ७४६ रुपये

logo
marathi.freepressjournal.in