
मुंबईतील मढ- मालाड येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या अनधिकृत स्टुडियोवर मुंबई महानगर पालिकेने आज कारवाई सुरु केली. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्यादेखील यावेळी हजर होते. ते म्हणाले की, "ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक उद्ध्वस्त करण्यास सुरुवात झाली. मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाडच्या मढ मार्वेमध्ये अनधिृकत स्टुडियो बांधण्यासाठी परवानगी दिली होती," असा अशी टीका त्यांनी यावेळी केली.
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, "तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या आशिर्वादानेच इथे डझनभर स्टुडियो उभारण्यात आले होते. अंदाजे २५ ते ५० हजार स्वेअर फूट बांधकामाला फेब्रुवारी २०२१मध्ये ठाकरे सरककारने मान्यता दिली होती. गेले २ वर्षे यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. पण न्यायालयाने आता आम्हाला न्याय दिला असून सुमारे १ हजार कोटींचे हे स्टुडियो तोडण्याचे काम सुरु झाले आहे"