BMC ने गणेशोत्सव पुस्तिका केली प्रसिद्ध; उत्सवाबाबत नागरिकांना उपयुक्त माहिती, डाउनलोड कशी कराल? 

मुंबई महापालिकेच्या ‘श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका- २०२४’चे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते झाले.
BMC ने गणेशोत्सव पुस्तिका केली प्रसिद्ध;
उत्सवाबाबत नागरिकांना उपयुक्त माहिती, डाउनलोड कशी कराल? 
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या ‘श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका- २०२४’चे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते झाले. 

पुस्तिकेत कृत्रिम तलावांच्या माहितीसह भरती व ओहोटीच्या वेळा, तसेच श्रीगणेश गौरव स्पर्धेच्या अर्जाचा नमुना देखील समाविष्ट आहे. ही पुस्तिका महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे तयार करण्यात आली असून महानगरपालिका मुद्रणालयाने छापली आहे. प्रकाशन सोहळ्याला  उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, उपायुक्त (शिक्षण) चंदा जाधव, उपायुक्त शरद उघडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी उपस्थित होते. पुस्तिकेत धोकादायक पुलांची यादी, महत्त्वाच्या नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, मूर्ती विसर्जन दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची इत्यादी माहितीचा समावेश आहे.

डाऊनलोडची सोय 

पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर असलेला 'क्यूआर कोड' स्कॅन करून ही पुस्तिका पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करता येणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील ही पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in