Mumbai : विद्यार्थ्यांना शालेय वस्तू उशिरानेच मिळणार; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

सन २०२६ - २८ या दोन वर्षांसाठी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वह्या, स्टेशनरी खरेदीचा १५७ कोटींहून अधिकचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र १५ जूनला शाळांची घंटा वाजणार आहे. त्यामुळे आता प्रस्ताव मंजूर केल्याने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू उशिरानेच मिळणार, असा दावा विरोधकांनी केला.
Mumbai : विद्यार्थ्यांना शालेय वस्तू उशिरानेच मिळणार; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर
Published on

मुंबई : सन २०२६ - २८ या दोन वर्षांसाठी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वह्या, स्टेशनरी खरेदीचा १५७ कोटींहून अधिकचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र १५ जूनला शाळांची घंटा वाजणार आहे. त्यामुळे आता प्रस्ताव मंजूर केल्याने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू उशिरानेच मिळणार, असा दावा विरोधकांनी केला.

विद्यार्थ्यांना शालेय वस्तू लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले.

मुंबई महापालिकेच्या शिशुवर्गासह पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश, प्लास्टिक पट्टी, कलर्स, ड्राईग पेन्सिल, ब्रश, पेन्सिल, खोडरबर,प्लॅ॑स्टिक बॉक्स, आदी २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जातात.

गणवेष, वह्या, स्टेशनरी खरेदीसाठी १५७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च करणार असून त्यासाठी काढलेल्या निविदांना स्थायी समितीच्या बैठकीत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मंजुरी दिली. मात्र एवढ्या उशिराने निविदा प्रक्रिया का राबवण्यात आली. तसेच शालेय वस्तू खरेदीत अनियमिता असल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in