
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने वांद्र्याच्या कार्टर रोड येथे महिलांसाठी पहिले ‘जिम ऑन व्हील्स’ सुरू केले आहे. या बस जिमच्या माध्यमातून गृहिणी आणि वृद्ध महिलांना फिटनेस साठीचे धडे दिले जाणार आहेत. या बसच्या माध्यमातून २८० महिला या जिमचा वापर करत आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. गुलाबी रंगांची बस सर्व उपकरणांसह गृहिणी आणि वयोवृद्ध महिलांना आकर्षित करत आहे. आणि यासाठी पालिकेने ३ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेने तयार केलेल्या या व्हिल्स जिममध्ये ट्रेडमिल, लॅट पुलडाउन, लेग एक्स्टेंशन, योगा बॉल, बॅटल रोप्स आणि १ ते १० किलो वजनाच्या डंबेलसह अनेक फिटनेस उपकरणे आहेत. याचा जास्तीत जास्त वापर पोलीस भरती आणि ऍथलेटिक्ससाठी तयारी करणाऱ्या महिला करतात.