

मुंबई : सृदृढ आरोग्यासाठी ‘पोहणे’ हा उत्तम व्यायाम मानला जातो. मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी मुंबई महापालिकेने १३ जलतरण तलाव सेवेत उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, आता ‘स्विमिंग पूल’मध्ये पोहणेही महागले आहे. पालिकेने ‘स्विमिंग पुला’च्या शुल्कात ५ टक्के वाढ केली असून सभासदांना मासिक पाससाठी १ हजार १६१ रुपये, त्रैमासिक पाससाठी २ हजार ३३१ रुपये, तर वार्षिक पाससाठी ९ हजार ७५१ रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईत सध्या महापालिकेने १३ जलतरण तलाव विविध ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. महापालिकेचे सध्या दादर, पश्चिम येथे महात्मा गांधी स्मा. जलतरण तलाव, चेंबूर, पूर्व येथे जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव, कांदिवलीत (पश्चिम) सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) मुंबई महापालिका जलतरण तलाव, दहिसर (पूर्व) येथे श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव, दहिसर (पश्चिम) येथे मुंबई महापालिका जलतरण तलाव, मुलुंडमधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलासह अन्य जलतरण तलावांचा समावेश आहे. मात्र मुलुंड, चेंबूर आणि दहिसर हे तीन जलतरण तलाव दुरुस्तीच्या कामासाठी बंदच असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ऑलिम्पिक दर्जाच्या स्विमिंग पुलाच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. २०२५-२६ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात नवीन प्रवेश घेताना प्रवेश शुल्क आणि सभासद शुल्क मिळून मासिक १ हजार ५२९ रुपये, त्रैमासिक ३ हजार ३७० रुपये आणि वार्षिक पाससाठी ११ हजार ७१० रुपये शुल्क भरावे लागत होते. परंतु आता २०२६-२७ मध्ये हेच शुल्क अनुक्रमे मासिक पाससाठी १ हजार ६०० रुपये, त्रैमासिक पाससाठी ३ हजार ५४० रुपये आणि q संमिश्र पानावर
महिलांच्या विशेष सत्रासाठी शुल्कवाढ
महिलांना विशेष सत्रासाठी प्रवेश घेताना (प्रवेश शुल्क आणि सभासद शुल्क मिळून) आधीच्या आर्थिक वर्षात नॉन ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावासाठी मासिक ९१३ रुपये, त्रैमासिक २,०३३ रुपये आणि वार्षिक ७ हजार ५३ रुपये शुल्क होते. आता हेच शुल्क मासिक पाससाठी ९६१ रुपये, त्रैमासिक पाससाठी २ हजार १४१ रुपये आणि वार्षिक पाससाठी ७ हजार ४११ रुपये झाले आहे.