Mumbai : रुग्णालयांतील सांडपाणी समुद्रात जाण्यापासून रोखणार; पुनर्वापर प्रक्रिया करणार; BMC च्या रुग्णालयांत 'एसटीपी प्लांट'

पिण्याच्या पाण्याचा वापर अन्य कामांसाठी करता यावा यासाठी महापालिकेच्या १६ उपनगरीय आणि ५ प्रमुख रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त विविध कामांसाठी पुनर्वापर करण्यात येणार आहे.
Mumbai : रुग्णालयांतील सांडपाणी समुद्रात जाण्यापासून रोखणार; पुनर्वापर प्रक्रिया करणार; BMC च्या रुग्णालयांत 'एसटीपी प्लांट'
Mumbai : रुग्णालयांतील सांडपाणी समुद्रात जाण्यापासून रोखणार; पुनर्वापर प्रक्रिया करणार; BMC च्या रुग्णालयांत 'एसटीपी प्लांट' 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : मुंबईतील पिण्याच्या पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता पाणी बचतीवर मुंबई महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यानंतर ते पाणी गटारात, नाल्यात सोडले जाते. पिण्याच्या पाण्याचा वापर अन्य कामांसाठी करता यावा यासाठी महापालिकेच्या १६ उपनगरीय आणि ५ प्रमुख रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त विविध कामांसाठी पुनर्वापर करण्यात येणार आहे.

मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा वापर होत असून त्यातील मोठा हिस्सा रुग्णालयांमधून सांडपाण्याच्या स्वरूपात बाहेर पडतो. या पाण्यावर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत १६ उपनगरीय रुग्णालये आणि ५ प्रमुख रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येणार आहेत.

‘एसटीपी’मधून प्रक्रिया केलेले पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नसून उद्यानांना पाणी देणे, रुग्णालय परिसरातील लाद्या व रस्ते धुणे, स्वच्छता राखणे, बागांची देखभाल तसेच इतर बिगर-पेयजल कामांसाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची बचत होण्यास मदत होणार असून जलस्रोतांचे संवर्धनही शक्य होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रदूषणात घट

पालिकेच्या या उपक्रमामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची बचत होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर सांडपाणी थेट गटारांमध्ये सोडण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून पर्यावरणपूरक पद्धतीने त्याचा पुनर्वापर केल्याने प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे. जलपुनर्वापराला प्रोत्साहन देण्याबरोबरच महापालिकेचा हा उपक्रम हरित आणि शाश्वत मुंबईच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in