मुंबईतील सिग्नल लुकलुकणार; देखभालीवर BMC १९ कोटी रुपये खर्च करणार

मुंबईतील पारंपरिक (कन्व्हेन्शनल नॉन-एटीसी) रस्ते वाहतूक सिग्नल यंत्रणा आणि फ्लॅशिंग बीकन (चमकणारे दिवे) सुरळीत ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पुढील दोन वर्षांत तब्बल १९ कोटी १५ लाख ५५ हजार ५०९ रुपये खर्च करणार आहे.
मुंबईतील सिग्नल लुकलुकणार; देखभालीवर BMC १९ कोटी रुपये खर्च करणार
मुंबईतील सिग्नल लुकलुकणार; देखभालीवर BMC १९ कोटी रुपये खर्च करणार संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील पारंपरिक (कन्व्हेन्शनल नॉन-एटीसी) रस्ते वाहतूक सिग्नल यंत्रणा आणि फ्लॅशिंग बीकन (चमकणारे दिवे) सुरळीत ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पुढील दोन वर्षांत तब्बल १९ कोटी १५ लाख ५५ हजार ५०९ रुपये खर्च करणार आहे. यासाठी १ सप्टेंबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२८ या कालावधीसाठी काम देण्यात येणार आहे.

पालिकेच्या प्रस्तावानुसार, बेट शहरातील कन्व्हेन्शनल नॉन-एटीसी रोड ट्रॅफिक सिग्नल सिस्टिम व फ्लॅशिंग बीकनच्या देखभालीसाठी ६ कोटी ३९ लाख ४० हजार २८२ रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर पश्चिम उपनगरासाठी हा खर्च ६ कोटी ७३ लाख ५ हजार ३९९ रुपये, तर पूर्व उपनगरासाठी ६ कोटी ३ लाख ९ हजार ८२८ रुपये इतका असेल. तिन्ही विभागांतील एकूण खर्च १९.१५ कोटी रुपये इतका आहे.

या देखभाल कामांमध्ये सिग्नल नियंत्रक यंत्रणा, सिग्नल दिवे, विद्युत उपकरणे, केबलिंग, फ्लॅशिंग बीकन यांचा समावेश असेल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in