‘होळी’साठी झाडे तोडली तर खैर नाही; मुंबई मनपा प्रशासनाचा इशारा

२४ मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळल्यास...
‘होळी’साठी झाडे तोडली तर खैर नाही; मुंबई मनपा प्रशासनाचा इशारा
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : होळी सणाला मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड केली जाते. अशी वृक्षतोड करताना आढळल्यास एक वर्षांची शिक्षा किंवा १ ते ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

२४ मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच ‘होळी’च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे किंवा पालिकेच्या ‘१९१६’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक तथा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव जितेंद्र परदेशी यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. अनधिकृत वृक्ष तोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला १ ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in