विद्यार्थी अनुभवणार प्रत्यक्ष सूर्य, चंद्रग्रहण; पालिका उभारणार १०० खगोलीय लॅब

सुरुवातीला प्रत्येक शाळेत खगोलीय लॅब सुरू करणे शक्य होत नसल्याने पहिल्या टप्प्यात १०० शाळांत खगोलीय लॅब सुरू करण्यात येणार आहेत.
विद्यार्थी अनुभवणार प्रत्यक्ष सूर्य, चंद्रग्रहण; पालिका उभारणार १०० खगोलीय लॅब

सूर्य, चंद्र ग्रहण हे आपण शालेय पुस्तकात वाचत आलो. सूर्य, चंद्र ग्रहण तसेच पृथ्वी, गुरू हे ग्रह कसे आहेत, त्यांना कसे ओळखावे याचा प्रत्यक्ष अनुभव आता पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. यासाठी मुंबई पालिकेच्या १०० शाळांमध्ये खगोलीय लॅब सुरु करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या १,२८० शाळांमध्ये चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप बस प्रवास मोफत अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही दुसऱ्या विषयाची आवड असते. पण सुविधा नसल्याने त्या विद्यार्थ्याला व्यक्त होता येत नाही. वरळी येथे मुंबई महापालिकेची खगोलशास्त्र लॅब आहे. परंतु मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता खगोलशास्त्र प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पालिकेची २४ वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डात पालिकेच्या चार ते पाच किंवा अधिक शाळा आहे.

सुरुवातीला प्रत्येक शाळेत खगोलीय लॅब सुरू करणे शक्य होत नसल्याने पहिल्या टप्प्यात १०० शाळांत खगोलीय लॅब सुरू करण्यात येणार आहेत. चार ते पाच शाळांसाठी एक लॅब उपलब्ध झाली, तर विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन खगोलशास्त्राचा अभ्यास करु शकतात. त्यामुळे अस्ट्रोमॅनी लॅब हा नवीन उपक्रम आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून १०० खगोलशास्त्र लॅब सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल

वरळीच्या प्रयोगशाळेत टेलिस्कोप असून ऐन वेळी काही घटना घडल्या की टेलिस्कोप द्वारे बघणे शक्य होते. अशा प्रकारचे टेलिस्कोप नवीन सुरू करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळेत उपलब्ध करण्यात येतील. जेणे करुन विद्यार्थ्यां मध्ये कुतूहल वाढेल आणि एखाद्या विद्यार्थ्याला आवड असेल तर तो यात पुढे जाईल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in