वाशी खाडीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

वाशी खाडीत सापडलेला मृत व्यक्ती अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील असून त्याचे संपूर्ण शरीर कुजलेले आहे
वाशी खाडीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
Published on

नवी मुंबई : वाशी खाडीमध्ये रविवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील सदर मृतदेह पोलिसांनी स्थानिक मच्छीमार व अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढून महापालिका रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

वाशी खाडीमध्ये रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी वाशी खाडी पुलावर धाव घेऊन स्थानिक मच्छीमार व अग्निशमन दलाच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेतील सदर व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला.

वाशी खाडीत सापडलेला मृत व्यक्ती अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील असून त्याचे संपूर्ण शरीर कुजलेले आहे. सदर मृत व्यक्तीच्या अंगावर काळी पॅन्ट व अंगात शर्ट आहे. कुजलेल्या अवस्थेतील सदर व्यक्तीचा दोन ते तीन दिवसांपूर्वी पाण्यात पडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in