बोगस भारतीय पासपोर्ट; बांगलादेशी नागरिकाला अटक

अनैत हौसेन अबू बशर असे या बांगलादेशी नगारिकाचे नाव आहे.
बोगस भारतीय पासपोर्ट; बांगलादेशी नागरिकाला अटक

मुंबई : बोगस भारतीय पासपोर्टसह व्हिसाच्या मदतीने विदेशात जाणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. अनैत हौसेन अबू बशर असे या बांगलादेशी नगारिकाचे नाव असून, त्याच्यावर बोगस दस्तावेज सादर करून भारतीय पासपोर्ट मिळविणे आणि व्हिसा मिळवून हॉंगकॉंगला नोकरीसाठी जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता अनैत हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हॉंगकॉंगला जाण्यासाठी आला होता. त्याच्या भारतीय पासपोर्टसह इतर कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्यात शंका निर्माण झाली होती. तसेच तो हॉंगकॉंगला जाण्याचे कारण सांगण्यास सांगू शकत नव्हता. त्यामुळे त्याला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in