मुंबई शहरात सहा ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी, अज्ञाताचा गुन्हे शाखेसह ATS कडून शोध सुरू

शहरात सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा असल्याचा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ...
मुंबई शहरात सहा ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी, अज्ञाताचा गुन्हे शाखेसह ATS कडून शोध सुरू

मुंबई : शहरात सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा असल्याचा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, धमकीचा मेसेज देणाऱ्या व्यक्तीच्या अटकेसाठी गुन्हे शाखेसह एटीएसने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बस्फोट होणार असल्याच्या निनावी कॉल आणि मेसेजमुळे मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण येत असल्याचे एका अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.

गुरुवारी रात्री वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका व्हॉट‌्सॲप क्रमांकावरून एक मेसेज प्राप्त झाला होता. त्यात आम्ही मुंबई शहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असून, या बॉम्बचा कुठल्याही क्षणी स्फोट होईल, असे नमूद करण्यात आले होते; मात्र सहा बॉम्बस्फोट कुठे आणि कधी होणार आहेत, याबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही. संबंधित व्यक्तीची स्वत:ची ओळख सांगितली नाही. ज्या मोबाईल क्रमांकावरून हा मेसेज आला आहे, तो कोड पाकिस्तानाचा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही माहिती नंतर संबंधित पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्‍यांना दिली होती. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मुंबई शहरातील बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in