
मुंबई : गंभीर गुन्ह्यांच्या आरोपपत्रांतही तपास अधिकारी साक्षीदारांची निवेदने कॉपी-पेस्ट करत असल्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
एका फौजदारी प्रकरणातील याचिका ऐकताना, औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि संजय देशमुख यांनी निरीक्षण नोंदवले की, आरोपपत्रात पुनरुत्पादित केलेली साक्षीदारांची निवेदने इतकी एकसारखी आहेत की परिच्छेददेखील त्याच शब्दांनी सुरू होतात आणि त्याच शब्दांनी संपतात.
गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील पोलिस अशाप्रकारे शॉर्टकट घेत असतील, तर हा गुन्हे न्याय व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे, असे न्यायालयाने म्हटले.
अशा प्रकारच्या कॉपी-पेस्ट निवेदनांमागे तपास अधिकाऱ्यांना कोणती अडचण येते, हे शोधण्याची आणि त्या त्रुटींचा स्वतःहून (suo motu) विचार करण्याची हीच वेळ आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने राज्य सरकारला तपास अधिकाऱ्यांनी साक्षीदारांचे निवेदन कसे नोंदवावे याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आदेश दिले.