ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

सोसायटीच्या व्हाट्सएप ग्रुपवर ऑपरेशन सिंदूर बाबत हास्यास्पद ईमोजी वापरून देशविरोधी स्टेटस ठेवणाऱ्या महिलेला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.
ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार
Published on

मुंबई : सोसायटीच्या व्हाट्सएप ग्रुपवर ऑपरेशन सिंदूर बाबत हास्यास्पद ईमोजी वापरून देशविरोधी स्टेटस ठेवणाऱ्या महिलेला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. जीवाची बाजी लावून ऑपरेशन सिंदूर फते करणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वावर चुकीच्या भावना व्यक्त करत एकप्रकारे खिल्ली उडवणे म्हणजे प्रथमदर्शनी गुन्हाच असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने फराह दीबा या महिले विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास नकार दिला.

फराह दीबा हिने व्हॉट्सअॅप स्टेटसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रध्वजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती याशिवाय सोसायटीच्या व्हाट्सएप ग्रुपवर ऑपरेशन सिंदूर बाबत ईमोजी वापरून खिल्ली उडवली होती. देशाला मक्कार असेही म्हटले होते .

न्यायालय म्हणते

जेव्हा संपूर्ण देश आपल्या सैन्यावर अभिमान बाळगत होता तेव्हा याचिकाकर्तीने ज्या प्रकारची भाषा वापरली आहे त्यावरून तिचा हेतू चुकीचा असल्याचे दिसून येतो.जेव्हा इतर लोक हिंदुस्तानी सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशस्वी मोहिमेचा उत्सव साजरा करत होते तेव्हा ती कदाचित हसणारा इमोजी वापरून प्रतिक्रिया देणे टाळू शकली असती.मात्र तिने तसे केले नाही त्यामुळे हा एकप्रकारे गुन्हा असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने तिची मागणी फेटाळली.

logo
marathi.freepressjournal.in