
मुंबई : मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिन्यांचा कालावधी का लागतो, एवढा विलंब का, असा सवाल उच्च न्यायाल्याने उपस्थित केला. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याची गंभीर दाखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेत केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
मूल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यास वर्षानुवर्षे वाट पहावी लागत असल्याचा अहवाल एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. पालकांना सरासरी साडेतीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागत असाल्याचे उघड झाले. या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली.
या याचिकेवर मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर यावर सोमवारी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने या प्रकरणात न्यायालयाला मदत करण्यासाठी वरिष्ठ वकील मिलिंद साठे आणि वकील गौरव श्रीवास्तव यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली. २३ जून रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.