छोटा राजन टोळीच्या दोघांना जन्मठेप कायम; जे. जे. दुहेरी हत्याकांड

१५ वर्षांपूर्वी जे जे रुग्णालयाजवळ घडलेल्या दुहेरी हत्याकांडा प्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावलेल्या छोटा राजन टोळीच्या दोघा गुंडांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला.
छोटा राजन टोळीच्या दोघांना जन्मठेप कायम; जे. जे. दुहेरी हत्याकांड
Published on

मुंबई : १५ वर्षांपूर्वी जे जे रुग्णालयाजवळ घडलेल्या दुहेरी हत्याकांडा प्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावलेल्या छोटा राजन टोळीच्या दोघा गुंडांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाने ठोठावलेलया जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करत आरोपींचे अपील फेटाळून लावले.

जे.जे. रूग्णालयाच्या जवळील फूल गल्ली येथे पंधरा वर्षापूर्वी १३ फेब्रुवारी २०१० रोजी शकील मोडक माहिती देणाऱ्या व्यक्तीसोबत खूर्चीवर बसले होते. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने मोडक यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आणखी तिघे हल्लेखोर तेथे आले. त्यांनी मोडक आणि कुरेशी या दोघांवर गोळीबार केला. पोलिसांनी मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे या दोघांना अटक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in