न्यायालयातील सुनावणीचे आता थेट ‘प्रक्षेपण’; मुख्य न्यायमूर्तींनी दाखवला हिरवा कंदील

न्यायालयाचे कामकाज पाहायचे किंवा सुनावणी ऐकायची झाली तरी कोर्टाची पायरी चढावीच लागते. त्यातही प्रकरणात पक्षकार असल्यास वारंवार न्यायालयाचे हेलपाटे मारावे लागतात. न्यायालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांपासून आता सुटका होणार आहे. उच्च न्यायालयातील सुनावणीचे थेट प्रक्षेपण लवकरच पाहता येणार आहे.
Mumbai High Court
Mumbai High Court
Published on

मुंबई : न्यायालयाचे कामकाज पाहायचे किंवा सुनावणी ऐकायची झाली तरी कोर्टाची पायरी चढावीच लागते. त्यातही प्रकरणात पक्षकार असल्यास वारंवार न्यायालयाचे हेलपाटे मारावे लागतात. न्यायालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांपासून आता सुटका होणार आहे. उच्च न्यायालयातील सुनावणीचे थेट प्रक्षेपण लवकरच पाहता येणार आहे. यासाठी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था केली जात आहे, असे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी मंगळवारी स्पष्ट केले आणि सुनावणी लवकरच लाइव्ह पाहता येणार असल्याचे संकेत दिले.

उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी जनहित याचिका दाखल केल्याचे ॲड. मॅथ्यूज नेदुमपारा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने थेट प्रक्षेपणासाठी तांत्रिक व्यवस्था केली जात असल्याचे नमूद केले. पूर्णपीठाने काही न्यायालयांचे थेट प्रक्षेपण करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने तांत्रिक व्यवस्था केल्या जात आहेत. सुरुवातीला पाच खंडपीठापुढील सुनावणींचे थेट प्रक्षेपण केली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

या पाच खंडपीठांपुढील सुनावणीचे होणार थेट प्रक्षेपण

  • मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे,

  • न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले,

  • न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन,

  • न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये,

  • न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील

logo
marathi.freepressjournal.in