...तर ती 'आयात' नाही; रशियन नागरिकाला Thar परत करण्याचे कोर्टाचे आदेश

भारतात नोंदणीकृत असलेले वाहन परदेशातील प्रवास पूर्ण करून समुद्रमार्गे कंटेनरमधून भारतात परत आणले असल्यास ते परदेशातून आयात केलेले वाहन ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
...तर ती 'आयात' नाही; रशियन नागरिकाला Thar परत करण्याचे कोर्टाचे आदेश
...तर ती 'आयात' नाही; रशियन नागरिकाला Thar परत करण्याचे कोर्टाचे आदेश
Published on: 

​मुंबई : भारतात नोंदणीकृत असलेले वाहन परदेशातील प्रवास पूर्ण करून समुद्रमार्गे कंटेनरमधून भारतात परत आणले असल्यास ते परदेशातून आयात केलेले वाहन ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना डेनिस व्हॅनिन या रशियन नागरिकाला त्यांची ‘महिंद्रा थार’ ही मोटारगाडी परत करण्याचे आदेश सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाला दिले आहेत.

याचिकाकर्ते डेनिस व्हॅनिन यांनी १२ ऑगस्ट २०२२ रोजी गोव्यात महिंद्रा थार खरेदी केली आणि त्यासाठी वस्तू व सेवा करासह (जीएसटी) आणि रस्ता कर पूर्णपणे भरला होता. त्यानंतर ५ जुलै २०२४ रोजी त्यांनी नेपाळमार्गे भारतातून आपला प्रवास सुरू केला. या प्रवासादरम्यान त्यांनी चीन, कझाकीस्तान, रशिया, जॉर्जिया, आर्मेनिया आणि इराण या देशांचा रस्तामार्गे प्रवास केला. इराणमधील बंदर अब्बास येथे वाहनाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी ते कंटेनरमध्ये ठेवून समुद्रमार्गे भारतात पाठवले. हे वाहन १७ नोव्हेंबरला न्हावा-शेवा बंदरात पोहोचले. ​मात्र, न्हावा-शेवा बंदरात पोहोचलेले वाहन परत करण्यासाठी सीमाशुल्क विभागाने प्रवेश देयक भरण्याची अट घातली. हे देयक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरण्यासाठी आयात-निर्यात कोड (आयईसी) किंवा जीएसटी क्रमांक असणे आवश्यक होते. व्हॅनिन यांच्याकडे हे क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे सीमाशुल्क विभागाने त्यांना वाहन परत करण्यास नकार दिला त्या विरोधात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in