मुंबई : नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ या वेबसिरिजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाने सीबीआयची याचिका फेटाळत नेटफ्लिक्सला दिलासा दिला आहे. सीबीआयकडून या वेबसिरीजच्या प्रदर्शनास विरोध करण्यात आला होता. पण आता सीबीआयचा प्रदर्शनास असलेला हा विरोध हायकोर्टाने ही सिरिज पाहिल्यानंतर नाकारला आहे. त्यामुळे ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ ही सिरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
एखादी व्यक्ती मुख्य आरोपी असताना, ती निर्दोष असल्याचे दाखवणे, तेही त्या प्रकणावर सुनावणी सुरू असताना हे अयोग्य असल्याचा युक्तिवाद सीबीआयकडून करण्यात आला होता. त्यामुळे हा माहितीपट प्रदर्शित होण्याआधी तो पाहणे आवश्यक असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर हायकोर्टात या सीरिजचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. त्यानंतर हायकोर्टाकडून या सिरिजचा रिलीज मार्ग मोकळा करण्यात आला आहे.