करणी सेनेच्या अध्यक्षांचा जामीन फेटाळला

“इंग्रजांच्या वतीने लढलेल्या गद्दार भारतीयांचा शौर्यदिन देशात साजरा कसा काय होतो? देशामध्ये गद्दारांचा सन्मान होता कामा नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ सरकारने पाडला पाहिजे,” असे विधान अजयसिंग सेंगर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते.
करणी सेनेच्या अध्यक्षांचा जामीन फेटाळला

मुंबई : भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी साजरा केला जाणाऱ्या ‘शौर्य दिना’बद्दल वादग्रस्त विधान करणारे करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा देण्यास नाकारला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी सेंगर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

“इंग्रजांच्या वतीने लढलेल्या गद्दार भारतीयांचा शौर्यदिन देशात साजरा कसा काय होतो? देशामध्ये गद्दारांचा सन्मान होता कामा नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ सरकारने पाडला पाहिजे,” असे विधान अजयसिंग सेंगर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. याप्रकरणी अ‍ॅड. अमित कटारनवरे यांनी अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेल्या तक्रारीच्या आधारे नवीन पनवेल पोलीस ठाण्यात सेंगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in