Mumbai : विमानतळावर नमाज नाही; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

धर्मापेक्षा विमानतळाची सुरक्षा ही महत्त्वाची असून कोणत्याही धार्मिक अथवा अन्य कारणासाठी तडजोड होऊच शकत नाही.
मुंबई उच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)
मुंबई उच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : धर्मापेक्षा विमानतळाची सुरक्षा ही महत्त्वाची असून कोणत्याही धार्मिक अथवा अन्य कारणासाठी तडजोड होऊच शकत नाही. असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने विमानतळ परिसरात रमजाननिमित्त नमाज पठण करण्याची मागणी  फेटाळून लावली.

न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने अखेर सुरक्षेच्या कारणास्तव  याचिका निकाली काढली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील तात्पुरत्या शेडमध्ये रिक्षा-टॅक्सी आणि ओला-उबर कॅब चालकांना नमाज पठण करण्याची परवानगी द्यावी या मागणी करीत टॅक्सी-रिक्षा ओला-उबर मेन्स युनियनने  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालय म्हणते... 

  • रमजान गेल्या महिनात १९ फेब्रुवारीला सुरू झाला. विमानतळ परिसरात नमाजासाठी परवानगी मिळाली नाही, म्हणून नमाज पठण थांबले का?

  • नमाज पठण करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. असे असले तरी नमाज पठणासाठी तुम्हाला विशिष्ट जागेचा हट्ट धरून मागणी करता येणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in