

मुंबई : दादर येथील ऐतिहासिक बुद्धभूषण मुद्रालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्या करणाचा तपास संत गतीने सुरू असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हा तपास एसआयटी किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याबाबत विचार करण्याच्या निर्देश न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.
डॉ. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे जून २०१६ मध्ये पाडकाम करण्यात आले. या घटनेच्या चौकशीसाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ते तक्रारदार आनंद आंबेडकर आणि मूळ विश्वस्तांचे जबाब अद्याप नोंदवले नसल्याचे समोर आल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.